घाटकोपर: मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काजीपणामुळे एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू; मयताच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांवर बीएमसीने दिले स्पष्टीकरण

घाटकोपर (Ghatkopar) येथील आझादनगर (Azadnagar) कोरोना सेंटरमध्ये (COVID Care Center) एका जेष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याबाबतची बातमी सामाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.

BMC (Photo Credits: Twitter)

घाटकोपर (Ghatkopar) येथील आझादनगर (Azadnagar) कोरोना सेंटरमध्ये (COVID Care Center) एका जेष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याबाबतची बातमी सामाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दुर्देवी आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेच्या (MCGM) निष्काजीपणामुळेच हा मृत्यू झाला आहे, असा आरोप मयताचे नातेवाईक या व्हिडिओमधून करत आहे. मात्र, हे आरोप चुकीचे असून यावर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मयताच्या शेजारी राहाणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शेजारच्या तिन्ही कुटुंबांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी एका कुटुंबियांतील जेष्ठ नागरिकांचा क्वारंटाईन सेंटरमध्ये मृत्यू झाला आहे.

ज्या कुटुंबियांशी संबंधित व्हिडिओ प्रसारित होत आहे. त्या कुटुंबियातील आई, वडिल, भाऊ, बहिण असे एकाच कुटुंबियातील चौघांना 23 जून रोजी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्राथमिक तपासणीदेखील करण्यात आली होती आणि त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. दरम्यान, 24 जून रोजी दुपारी या कुटुंबियातील जेष्ठांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले. त्यावेळी प्रशासनाने त्यांच्यावर औषधोपचार दिल्यानंतर त्याना बरे वाटू लागले होते. तसेच राजावाडीच्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला होता. सायंकाळी वाजता जेष्ठ व्यक्तिला पुन्हा ओआरएस देखील पुवण्यात आले. दरम्यान, काही वेळाने जेष्ठ व्यक्तिचा क्वारंटाईन सेंटरमधील प्रसाधनगृहात अडकल्याने व दरवाजा उघडत नसल्याचे कळाले. दरम्यान, प्रसाधनगृहाचा दरवाजा तोडून त्यांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना मृत घोषीत करण्यात आले, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. हे देखील वाचा- Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

मुंबई महानगरपालिकेचे ट्विट-

दरम्यान, मृत व्यक्तिच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करत मुंबई महानगर पालिकेला जबाबदार ठरवले. प्रशासनाच्या निष्काजीपणामुळे हा मृत्यू झाला आहे, असेही मृताचे नातेवाईक म्हणाले आहेत. परंतु, आज संबंधित जेष्ठ नागरिकांचा कोरोनाचा अहवाल असून त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशीही माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे.