Prashant Damle: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले
प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूहा'चे कार्यकारिणीवर वर्चस्व पाहायला मिळत आहे.
पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक मध्यंतरी पार पडली पण अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच होती. या निवडणुकीत अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी बाजी मारली आहे. आज अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली असून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांचे 'आपलं पॅनल' आणि प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं 'रंगकर्मी समूह' या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली. प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले या दोघांमध्ये कोण लढत जिंकणार याची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर निकाल हाती आला आहे. सगळ्यांचं लक्ष लागलेलं असलेली जागा म्हणजे नाट्यपरिषदेचं अध्यक्षपद प्रशांत दामले यांनी जिंकलेलं आहे.
प्रशांत दामलेंच्या (Prashant Damle) 'रंगकर्मी नाटक समूहा'चे कार्यकारिणीवर वर्चस्व पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 16, 2023 03:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

