Uttamrao Jankar On Ajit Pawar: अजित पवार बारामतीत 40 हजार मतांनी पराभूत होतील; निकालापूर्वी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांचा दावा

अजित पवार यांचा 40,000 मतांनी पराभव होईल, असं भाकित उत्तम जानकर यांनी केलं आहे.

Uttamrao Jankar, Ajit Pawar (फोटो सौजन्य - फेसबुक)

Uttamrao Jankar On Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आणि माळशिरस मतदारसंघातील उमेदवार उत्तम जानकर (Uttamrao Jankar) यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Constituency) अजित पवारांचा (Ajit Pawar) मोठा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे. अजित पवार यांचा 40,000 मतांनी पराभव होईल. अजित पवारांना मिळालेले मत म्हणजे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीचं मत आहे. बारामती तालुका हा सोपा नाही. या मतदारसंघातील उमेदवाराने राज्यात सत्ता स्थापित केली होती. त्यामुळे बारामतीत भाजप किंवा अजित पवार गटाचा पराभव निश्चित आहे. युगेंद्र पवार यांचा विजय निश्चित आहे, असं भाकित उत्तम जानकर यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी बारामती आणि नजीकच्या तालुक्यांतील सभांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी अजित पवारांच्या पराभवाचे भाकीत केले होते. जानकर यांनी महाविकास आघाडीच्या विजयाच्या संभाव्यतेवर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, महाविकास आघाडीला राज्यात 180-200 जागा मिळतील आणि आम्ही सरकार स्थापन करू. (हेही वाचा -Exit Poll Results 2024 For Maharashtra: महायुती चं सरकार महाराष्ट्रात पुन्हा येणार; एक्झिट पोल्सचे अंदाज)

अजित पवार बारामतीत 40 हजार मतांनी पराभूत होतील - उत्तम जानकर 

राम सातपुते यांचा पराभव; उत्तम जानकर यांचा दावा -

माळशिरस मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांचे तगडे आव्हान आहे. आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत जानकर यांनी म्हटलं आहे की, ही लढत मीच जिंकणार असून, राम सातपुते यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. या निवडणुकीत तालुक्याला आणखी विकासाकडे नेण्यासाठी मला 1 ते दीड लाख मतांची अपेक्षा आहे. भाजपची धोरणे आणि विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या व्यवसायाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांचा पराभव होईल, असं जानकर यांनी म्हटलं आहे.