IPL Auction 2025 Live

Ajit Pawar Takes Oath As Deputy CM Of Maharashtra: अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री पदी, 9 NCP आमदारांची मंत्रीपदी वर्णी; शरद पवार यांना धक्का

अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनावर दिली आहे.

Ajit Pawar | Twitter

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला वर्षपूर्वी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. राजभवनावर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy CM Of Maharashtra) शपथ घेतली आहे. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसोबत एनसीपीच्या 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. छगन भुजबळ, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम यांचा समावेश आहे. अजित पवारांना एनसीपीच्या 50 पैकी 40 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. राजभवनावर आज शिंदे, भाजपा आणि एनसीपीचे आमदार एकत्र खेळीमेळीने बोलताना दिसले आहेत.

मागील काही दिवसांपासून भाजपा यासाठी जुळवाजुळव करत असल्याचं चित्र पहायला मिळत होते. त्याची दबक्या आवाजात चर्चा होती. देवेंद्र फडणवीस यांनी याबबतचे अनेकदा संकेत दिले होते. आज अखेर ते प्रत्यक्षात उतरले आहे. एनसीपी मध्ये झालेल्या घडामोडींनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या अनेकदा चर्चा रंगल्या होत्या. परंतू अजित पवार यांनी आपण एनसीपीला सोडचिठ्ठी देणार नसल्याचं म्हटलं होतं. पण आज अखेर त्यांनी शरद पवार यांना धक्का दिला आहे. Maharashtra Politics: अखेर अजित पवार यांनी धक्का दिलाच; एनसीपी आमदार सरकार मध्ये दाखल होण्यासाठी सज्ज, थोड्याच वेळात शपथविधी .

अजित पवार नवे उपमुख्यमंत्री

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakal News (@sakalmedia)

अडीज वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र दीड दिवसांतच शरद पवार यांच्यासोबत ते आले आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सध्या उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस देखील आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. त्यांची वर्णी केंद्रामध्द्ये लागणार का? याची देखील चर्चा आहे.

अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचा शपथविधी राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये झाला आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे, सुनील तटकरे देखील राजभवनात दिसले.