Ajit Pawar on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, निधीत वाढ करणार : अजित पवार
महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आघाडी लवकरच आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar on Ladki Bahin Scheme : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका व्हिडिओच्या मार्फत सरकारच्या योजनांबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Scheme) बंद करण्याचे विरोधकांचे स्वप्न कधीच यशस्वी होणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. या योजनेने महिलांना स्वावलंबी बनवून सक्षम केले आहे. या योजनेमुळे लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. (हेही वाचा - Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का; माजी आमदार राजन तेलींचा भाजपला रामराम! आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थित करणार पक्षप्रवेश )
पाहा व्हिडिओ -
माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो की, ही योजना बंद होऊ देणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा एकूण 7500 रुपयांचा हप्ता मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. यासाठी 46 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना 1500 रुपये देते.
दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23तारखेला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आघाडी लवकरच आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.