AIMIM Rally In Mumbai: एमआयएमची रॅली मुंबईमध्ये दाखल, महत्त्वाच्या अपडेट्स

दरम्यान, एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथून निघालेली एक रॅली मुंबईपर्यंत ( Aurangabad to Mumbai) पोहोचली आहे.

Imtiaz Jaleel | (Photo Credits: Facebook)

एमआयएमचे (AIMIM ) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या मुंबईत होणाऱ्या सभेबाबत जोरदार चर्चा आहे. दरम्यान, एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथून निघालेली एक रॅली मुंबईपर्यंत ( Aurangabad to Mumbai) पोहोचली आहे. ही रॅली मानखूर्द येथे दाखल झाली असून पुढे निघाली आहे. असदुद्दीन ओवैसी यांची सभा आणि शहरातील अमायक्रॉन स्ट्रेनचा वाढता धोका या पर्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांची रॅली (AMIM Rally) नवी मुंबई येथेच अडविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केली आणि ही रॅली पुढे सोडण्यात आली.

इम्तिजाय जलील यांच्या आरोपाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता, जलील यांचा दावा फेटाळून लावत ते म्हणाले, हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. केवळ एखाद्या पक्षाला धोका आहे म्हणून विरोध केला जातो आहे हे म्हणने सारासार चूक आहे. पोलीस त्यांच्या कर्तव्यावर ठाम आहेत. ते त्यांचे कर्तव्य बजावत असतात, असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif