Mumba Devi Mandir Dress Code: मुंबईत सिद्धिविनायक मंदिरापाठोपाठ मुंबादेवी मंदिरातही ड्रेसकोड जारी होणार

विशेषत: परदेशी पर्यटक जे मंदिर भेटी दरम्यान योग्य कपडे घालून येत नाहीत त्यांच्यासाठी योग्य गाईडलाईन्स बनवण्यासाठी विश्वस्तांशी चर्चा केली जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे.

Mumba Devi Mandir Dress Code: मुंबईत सिद्धिविनायक मंदिरापाठोपाठ मुंबादेवी मंदिरातही ड्रेसकोड जारी होणार
Mumba Devi | X @ANI

सिद्धिविनायक मंदिरापाठोपाठ (Siddhivinayak Mandir)आता मुंबई मध्ये आता मुंबादेवी मंदिरातही ड्रेसकोड (Mumba Devi Mandir Dress Code) लागू करण्यात आला आहे. भूलेश्वर भागात असलेल्या मुंबादेवीचं मंदिर हे या शहराचं ग्रामदैवत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा या देवीच्या मंदिराकडे विशेष ओढा असतो. सोबतच अनेक परदेशी पाहुणे देखील मुंबादेवीच्या दर्शनाला येतात पण आता या मंदिरामध्येही प्रवेशासाठी विशेष ड्रेसकोड पाळावा लागणार आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या माहितीनुसार, मंदिर प्रशासनाच्या हेमंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे मुंबादेवीच्या मंदिरातही ड्रेसकोड जारी होणार आहे. विशेषत: परदेशी पर्यटक जे मंदिर भेटी दरम्यान योग्य कपडे घालून येत नाहीत त्यांच्यासाठी योग्य गाईडलाईन्स बनवण्यासाठी विश्वस्तांशी चर्चा केली जाईल. Siddhivinayak Mandir Dress Code: प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता अंगभर कपडे परिधान केलेल्यांनाच बाप्पाचं दर्शन मिळणार; ड्रेसकोड होणार जारी .

मुंबईच्या मंदिरांमधील ड्रेसकोड

सिद्धिविनायक मंदिरामध्ये नव्या ड्रेसकोड नुसार आता रिप्ड जीन्स, अंगप्रदर्शन करणारे कपडे घालता येणार नाहीत. मुंबई मध्ये केवळ मंदिरात नाही तर यापूर्वी चर्च मध्येही ड्रेसकोड जारी आहे. 2005 मध्ये, Archbishop of Bombay, Cardinal Ivan Dias यांनी चर्चला जाणाऱ्यांसाठी ड्रेस कोड आणला आणि सदस्यांना धार्मिक सेवांसाठी अयोग्य समजल्या जाणाऱ्या कॅज्युअल पोशाखाऐवजी त्यांच्या "संडे बेस्ट" मध्ये पोशाख घालण्याचे आवाहन केले.

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 11:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).