पुणे: पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोविडमुळे मृत्यू, बेजबाबदार आरोग्य, प्रशासकीय अधिकार्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा; वेब मीडिया असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष अनिल महाजन यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे मागणी
त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहले आहे.
पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा पुणे कोविड सेंटर मध्ये मृत्यू झाला एका वरिष्ठ पत्रकाराला रुग्णवाहिका न मिळन म्हणजे हे शासनाचे अपयश आहे आणि पत्रकारांचे दुर्देव आहे .येथील आरोग्य प्रशासकीय, शासकीय अधिकारी व स्थानिक बेजबाबदार अधिकारी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अनिल महाजन, प्रदेश अध्यक्ष वेब मीडिया असोसिएशन मुंबई यांनी केली आहे. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहले आहे.
कोरोना सारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून अनेक पत्रकार फिल्ड वर बातमी संकलन साठी फिरत आहेत. त्यात फिल्ड वर्क करणारा पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा पुणे येथील आरोग्य यंत्रणेने घेतला बळी आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जी पणा मुळे ह्या पत्रकाराचा मृत्यू झाला वेळेवर ट्रीटमेन्ट दिली गेली नाही त्यात रुग्णवाहिका मिळाली नाही एका टीव्ही चॅनलच्या पत्रकाराला रुग्ण वाहीका मिळत नाही तर सर्व सामान्याचे काय हाल होत असतील. प्रशासनावर कोणाची वरिष्ठ लोकांची कमांड दिसत नाही आहे यात हे सिद्ध झाले आहे.राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या परिवाराला मोठी आर्थिक मदत जाहीर करावी आणि आरोग्य विभागाच्या संबंधित कामचोर अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही आपणास वेब मीडिया असोसिएशन मुबंईच्या वतीने करत आहोत पत्रकाराच्या सुविधे बाबत व पत्रकारावर होणाऱ्या हल्ले बाबत कुठला शासकीय अधिकाऱ्याने संवेदनशील पणे जबाबदारी ने बघितले पाहिजे आशा प्रकारचा आदेश आपण पारित करावा जेणे करून परत कुठला पांडुरंग सारखा पत्रकार दगावला नाही पाहिजे पत्रकार दगावणे म्हणजे हे देशाचे समाजाचे खूप मोठे नुकसान आहे आपण योग्य कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली आहेत.
दरम्यान काल (2 सप्टेंबर) दिवशी पांडुंरंग रायकर या पत्रकाराचा वयाच्या 42 व्या वर्षी कोविड 19 शी लढताना मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनची पातळी खालावल्यानंतर जम्बो सेंटर मधून त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात नेण्यासाठी वेळेत कार्डिएक अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप परिवाराकडून करण्यात आला आहे.