Affordable Liver Transplant: मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात बाल यकृत प्रत्यारोपण योजनेस सरकारकडून 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर

यकृत प्रत्यारोपण (Affordable Liver Transplant Scheme) करण्याची आवश्यकता असलेल्या गरजू मुलांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुंबई येथील फोर्ट परिसरातील सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये (St George Hospital Mumbai) बाल यकृत प्रत्यारोपण सेवा सुरु करण्यात आली आहे.

Liver Transplant | (Photo credit: archived, edited, representative image)

यकृत प्रत्यारोपण (Affordable Liver Transplant Scheme) करण्याची आवश्यकता असलेल्या गरजू मुलांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुंबई येथील फोर्ट परिसरातील सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये (St George Hospital Mumbai) बाल यकृत प्रत्यारोपण सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उल्लेखनीय असे की, मुंबईमध्ये जवळपास डझनभर तरी यकृत प्रत्यारोपण केंद्र आहेत. मात्र, ही सर्वच्या सर्व खासगी आहेत आणि त्यातील काहीच केंद्रे मुलांचे यकृत प्रत्यारोपण सेवा (Liver Transplant Facility) देतात. या सर्वात धक्कादायक बाब अशी की, मुंबईसारख्या महाकाय शहरात एकही असे सरकारी केंद्र नाही येते ही सेवा उपलब्ध करुन दिलेली असते.

बीएमसीची केईएम हॉस्पीटलसोबत यकृत प्रत्यारोपण योजना

मुंबई महापालिकेने नाही म्हणायला केईएम हॉस्पीटलसोबत यकृत प्रत्यारोपण सेवा एका दशकापूर्वी सुरु केली आहे. पण, असे असले तरी या केंद्रात बालरोगविषयी कोणताच रुग्ण हातळण्यात आला नाही. त्यातही कोरोना महामारीनंतर या केंद्रावर कोणत्याही प्रकारचे यकृत प्रत्यारोपण झाले नाही. परेल येथील वाडीया बालरोग रुग्णालय हे एकमेव अनुदानीत बालरोग अवयप्रदाता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.  (हेही वाचा, Organs Donate: मृत्यूमुळे शरीर संपले, अवयव मात्र जीवंत; डोळे, फुफ्फुस, यकृत, किडनी, मूत्रपिंड कार्यरत, अवयवदानाची कमाल)

पायाभूत सुविधांवर भर

जेजे हॉस्पीटलच्या डीन डॉ. पल्लवी सपळे यांनी सांगितले की, ट्रान्सप्लांट सेंटर स्थापन करण्याची योजना पाठिमागील एक वर्षभरापासून सुरु होती. त्याला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून या योजनेला वेग मिळाला. ही योजना कार्यन्वीत करण्यासाठी आम्हाला एचएन रिलायन्स हॉस्पीटलद्वारे काही सहकार्य मिळण्याची आशा आहे. त्यांच्या पथकाने आमच्या पायाभूत सुविधांबाबत मुल्यांकन केले आहे. त्यानुसार काही शिफारशीरही त्यांनी केल्या आहेत. ज्यामध्ये आयसीयू आकार, सेंट जॉर्जमध्ये अवयवदान करणारा अवयवदाता आणि प्राप्तकर्ता यांच्यासाठी भरणपोषण गृहाची (रिकवरी रुम) निर्मीत अशा काही शिफारशींचा समावेश आहे. (हेही वाचा -Pune: ब्रेन डेड मुलीने लष्कराच्या जवानासह 5 जणांना दिले नवजीवन, किडनी, यकृत आणि डोळे केले दान)

किफायतशीर दरात प्रत्यारोपण

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार केवळ उपभोग घेण्यात येणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावू शकते. त्यामुळे या प्रत्यारोपणासाठी खासगी रुग्णालयांच्या तुलनेत येणारा खर्च अगदी कमी आहे. खासगी रुग्णालयात हा खर्च जवळपास 17 लाखांच्या घरात असल्याचे समजते.

वाडिया हॉस्पीटलचे सीईओ डॉ. मिन्नी बोधनवाला यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, प्रतीवर्षी सरासरी 1500-2000 लीवर प्रत्यारोपण केले जातात. ज्यामध्ये 10% बालके असतात. दरम्यान, धक्कादायक माहिती अशी की, एकूण मागणीच्या हा पुरवठा 10% इतकाही नसतो. दरवर्षी रुग्णालयात जवळपास 300-400 मुले यकृताच्या आजाराने ग्रस्त अतात. ज्यातील 2-5% बालकांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्कता असते. वाडियाने ऑक्टोबर 2022 मध्ये चार प्रत्यारोपण केली आहेत. मात्र, याच काळात 23 मूले प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now