महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल: आदित्य ठाकरे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, ऋतुराज पाटील यापैंकी हे युवा नेते विजयी उंबरठ्यावर

यामुळे या निवडणुकीत कोणता युवा नेता जनेतेच्या मनात जागा निर्माण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये आदित्य ठाकरे, रोहीत पवार, संदिप क्षीरसागर, रोहीत पवार, धीरज देशमुख या युवा नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे या निवडणुकीत कोणता युवा नेता जनेतेच्या मनात जागा निर्माण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांनाही मावळ येथून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, पार्थ यांचा पराभव झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली असून आज संपूर्ण महाराष्ट्रात मतमोजणी सुरु आहे. यानुसार कोणता युवा नेता आघाडीवर आहे, तर कोण पिछाडीवर आहे याची माहिती खालील प्रमाणे-

अदित्य ठाकरे:

शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. अदित्य ठाकरे यांना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. अदित्य ठाकरे यांनी काही वर्षापूर्वीच राजकारणात उडी घेवून युवानेतेचा कारभार खांद्यावर घेतला होता. अदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्याविरोधात अभिजीत बिचकुले यांना उमेदवारी देण्यात आली होती. सध्या अभिजीत बिचकुले पछाडीवर असून अदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.

रोहित पवार:

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सध्या रोहित पवार राष्ट्रवादीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांच्यासोबत अधिक वेळ घालवत असल्याचे दिसले होते. या निवडणुकीत रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत रोहीत पवार यांच्या बाजूने निकाल झुकत असून सध्या ते अघाडीवर आहेत.

संदीप क्षीरसागर:

महाराष्ट्र निवडणुकीत राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात मिळाली होती. संदीप क्षीरसागर मराठवाडा मतदारसंघातून त्यांचे काका जयदत क्षीरसागर यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षातून आपले राजकीय प्रवास सुरु करणारे संदीप क्षीरसागर आणि जयदत क्षीरसागर यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार, असा अंदाज वर्तवला आता होता. सध्या संदिप क्षीरसागर आघाडीवर असून त्यांचे काका जयदत क्षीरसागर पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

ऋतुराज पाटील:

राज्य विधानसभेच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ऋतुराज पाटील यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार अमल महादेवराव महाडीक हे उभे होते. या निवडणुकीत पाटील यांच्या बाजूने विजय लागेल, अशी अपेक्षा केली जात होती. त्यानुसार महाराष्ट्रविधानसभा निवडणुकीचा निकाल ऋतुराज पाटील यांच्या बाजूने लागत असल्याचे दिसत आहे.