Bharat Jodo Yatra: आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सामील, राहुल गांधी यांच्यासोबत केली पदयात्रा
त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patol), राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) हेही सहभागी झाले होते.
आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सामील झाले. हिंगोली येथे शुक्रवारी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत पदयात्रा केली. गुरुवारी यात्रेच्या 64व्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) याही राहुल गांधींसोबत नांदेडमध्ये यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) हेही सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार होते, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते सहभागी झाले नाहीत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने ते यात्रेला उपस्थित राहणार नाहीत. राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' हे कटुतेचे वातावरण संपवून देशाला एकत्र आणण्याचे आंदोलन आहे, असे उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या घरी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी ही माहिती दिली. हेही वाचा Chandrasekhar Bawankule On Sharad Pawar: चंद्रशेखर बावनकुळे यांचे शरद पवारांवरील विधान वादाच्या भोवऱ्यात
काँग्रेसची भारत जोडी यात्रा तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली. तामिळनाडूनंतर ही पदयात्रा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रात पोहोचली आहे. ही यात्रा राज्यातील 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यादरम्यान 382 किमी अंतर कापले जाईल. ही यात्रा 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात दाखल होणार आहे.