IPL Auction 2025 Live

Accidents on Samruddhi Mahamarg: डिसेंबर 2022 मधील उद्घाटनापासून समृद्धी महामार्गावर तब्बल 125 जीवघेणे अपघात, 215 बळींची नोंद

555 अपघात डोळ्यावर असलेल्या झोपेमुळे नोंदवले गेले आणि 434 अपघात टायर फुटल्याने झाले. यांत्रिक बिघाड आणि अतिवेगाने प्रत्येकी 73 अपघात झाले.

Samruddhi Mahamarg (Pic Credit: Wikimedia Commons)

Accidents on Samruddhi Mahamarg: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे (HBTMSM) 11 डिसेंबर 2022 रोजी उद्घाटन झाल्यापासून, या रस्त्यावर 7 ऑगस्ट 2024 पर्यंत 125 जीवघेणे अपघात झाले असून, 215 बळी गेले आहेत. यामध्ये वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या 37 अपघातांमध्ये 55 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच चालकाची झोप पूर्ण न झाल्याने 18 अपघात झाले, ज्यामध्ये 28 जणांनी आपला जीव गमावला. आतापर्यंत जवळपास 1.2 कोटी वाहनांनी या एक्स्प्रेस वेचा वापर केला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या मते, अपघातांच्या संभाव्य कारणांमध्ये डोळ्यावरील प्रचंड झोप, अतिवेग, रॅश ड्रायव्हिंग, ओव्हरलोडिंग, मद्यपान आणि ड्रायव्हिंग, तणाव, रस्ता संमोहन आणि लक्ष विचलित होणे यांचा समावेश होतो.

एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने 1,013 अपघातांची नोंद झाली आहे. 555 अपघात डोळ्यावर असलेल्या झोपेमुळे नोंदवले गेले आणि 434 अपघात टायर फुटल्याने झाले. यांत्रिक बिघाड आणि अतिवेगाने प्रत्येकी 73 अपघात झाले, तर रॅश ड्रायव्हिंगमुळे 32 अपघात झाले. त्याचप्रमाणे एक्सप्रेसवेवर 215 प्राणघातक अपघातांव्यतिरिक्त किरकोळ जखमींच्या 1,871 घटना आणि मोठ्या दुखापतींच्या 1,251 घटनांची नोंद झाली आहे.

अपघात टाळण्याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, ते संपूर्ण एक्स्प्रेस वेसाठी इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम (ITS) स्थापित करणार आहेत. याशिवाय, चबीटीएमएमच्या बाजूने झाडे लावणे याशिवाय मिडियनला चमकदार रंगांनी रंगवण्यासारखे विविध उपायही केले जात आहे, जेणेकरून वाहनचालक महामार्गाच्या संमोहनाला बळी पडू नयेत परिणामी अपघात कमी होतील. (हेही वाचा: Atal Setu: उद्घाटनानंतर दोन महिन्यातच ‘अटल सेतू’च्या अप्रोच रोडला गेल्या तडा; MMRDA ने कंत्राटदाराला ठोठावला 1 कोटीचा दंड, पाठवली कारणे दाखवा नोटीस)

सध्या, एमएसआरडीसीने CP-1 ते CP-14 पर्यंतची कामे पूर्ण केली आहेत. नागपूर ते शिर्डी दरम्यानचा 520 किमीचा पहिला टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी, तर शिर्डी ते भरवीर दरम्यानचा 80 किमीचा दुसरा टप्पा 26 मे 2023 रोजी खुला करण्यात आला. नंतर भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा 25 किमीचा तिसरा टप्पा 4 मार्च 2024 रोजी उघडण्यात आला. सध्या समृद्धी महामार्गाच्या एकूण 701 किमी पट्ट्यांपैकी 625 किमी कार्यान्वित करण्यात आला आहे, तर उर्वरित 76 किमी लांबीचे काम सप्टेंबर 2024 अखेर पूर्ण होईल.