Accident On Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर कारला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अद्यापही अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव नाही. या मार्गावर पुन्हा एकदा झालेल्या ताज्या अपघातात दोघांचे प्राण गेले आहेत. ही घटना समृद्दी बुलढाणा मार्गावर देऊळगाव कोळ गावानजीक घडली. बुलढाणा जवळ असलेल्या देऊळगाव कोळ गावाजवळ चेनेज 305 नजीक मुंबई कॉरिडॉरवर हा अपघात घडला.

Accident On Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर कारला आग, दोघांचा होरपळून मृत्यू
Fire | (Photo Credit - Twitter)

Buldhana Accident News: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अद्यापही अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव नाही. या मार्गावर पुन्हा एकदा झालेल्या ताज्या अपघातात दोघांचे प्राण गेले आहेत. ही घटना समृद्दी बुलढाणा मार्गावर देऊळगाव कोळ गावानजीक घडली. बुलढाणा जवळ असलेल्या देऊळगाव कोळ गावाजवळ चेनेज 305 नजीक मुंबई कॉरिडॉरवर हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेली कार नागपूरहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. महामार्गावरुन प्रवास करताना कारला अचानक आग लागली. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. इम्पॅक्ट बॅरियरला कार धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातग्रस्त कार चालक, मालक यांच्याबाबत तसेच अपघातात मृत्यू झालेल्यांबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. समृद्धी महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असताना कार इम्पॅक्ट बॅरियरला धडकली. त्यामुळे अपघात घडून कारला भीषण आग लागली. आगीने पुढच्या काहीच क्षणात मोठे रुप धारण केले. परिणामी कारमधील कोणत्याच प्रवाशाला अथवा चालकाला प्राण वाचविण्याची कोणतीच संधी मिळाली नाही. घटना इतक्या वेगाने घडल्या की, कारमधील दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Samruddhi Mahamarg Phase 2: सुरु झाला समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा; CM Eknath Shinde यांची हस्ते शिर्डी ते भरवीर मार्गाचे उद्घाटन)

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरु केले. आगिवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्नही वेगाने झाला परंतू त्याचा फायदा झाला नाही. पोलिसांनी अपघातग्रस्त पोलिसांना कारमधून बाहेर काढले पण, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दोघांचा जागीच मृत्यू झाला. एक जीवंत होता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 08:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).