Mumbai AC Local Train: ट्रान्स हार्बर मार्गावर पुन्हा एकदा उद्यापासून वातानुकूलित लोकल ट्रेन्स धावणार

मध्य रेल्वेकडून बुधवारी घोषणा करत असे सांगण्यात आले की, ट्रान्स हार्बर मार्गावर पुन्हा एकदा उद्यापासून (7 ऑक्टोंबर) 16 वातानुकूलित लोकल ट्रेन्स धावणार आहेत.

Mumbai AC Local (Photo Credit: PTI)
Mumbai AC Local Train: मध्य रेल्वेकडून बुधवारी घोषणा करत असे सांगण्यात आले की, ट्रान्स हार्बर मार्गावर पुन्हा एकदा उद्यापासून (7 ऑक्टोंबर) 16 वातानुकूलित लोकल ट्रेन्स धावणार आहेत. तसेच मध्य रेल्वेकडून आपल्या उपनगरीय नेटवर्कवरील रेल्वे सेवांची संख्या 7 ऑक्टोबरपासून वाढवणार आहेत. कोरोनाच्या परिस्थितीपूर्वीच्या परिस्थितीसारखे ही सेवा 96 टक्क्यांवर आणणार आहेत. तर कोरोनाच्या परिस्थितीमुळे रेल्वेकडून अन्य उपनगरीय ठिकाणची वातानुकूलित लोकल सेवा बंद करण्यात आली होती.

कोरोना व्हायरससंबंधित नियमात शिथिल करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा एसी लोकल सर्विस प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, पहिली एसी लोकल ट्रेन ही ट्रान्स हार्बर मार्गावर 7ऑक्टोंबरला पनवेल येथून ठाणे पर्यंत सकाळी 5.44 वाजता धावणार आहे. तर अखेरची लोकल ही पनवेल येथून ठाण्यासाठी रात्री 10.46 वाजता सुटणार आहे. उपनगरीय ट्रेन विभाग हा ठाणे आणि नवी मुंबईली जोडला जातो.

एकूण 16 एसी लोकल या सोमवार ते शुक्रवार धावणार आहेत. तर विनावातानुकूलित लोकल ही शनिवारी चालवली जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे पब्लिक रिलेशन चीफ शिवाजी सुतार यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की, ही सेवा रविवारी/सुट्टीच्या दिवशी चालवली जाणार नाही आहे. या दोन दिवशी विनावातानुकूलित लोकल या रविवारच्या वेळापत्रकानुसार ठाणे आणि नेरुळ दरम्यान धावणार आहे.(Mumbai Local Train Update: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस; अप ट्रान्स-हार्बर मार्ग, कर्जत-कल्याण आणि कसारा-कल्याण विभागात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड)

वातानुकूलित लोकल सेवा सुरु झाल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलची संख्या 246 वरुन 262 होणार आहे. ध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवांची संख्या सध्याच्या 1,686 वरून 1,702 पर्यंत वाढवली जाईल - जी पूर्व -कोरोनाव्हायरस पातळीच्या 95.94 टक्के आहे.

दरम्यान, पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र त्यासाठी सुद्धा लसीकरणानंतर 14 दिवस पूर्ण झालेले असावेत. तर शासकीय कर्मचारी आणि त्यासंबंधित अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी दिली गेली आहे.