Maharashtra Politics: ..तर मी आठ दिवसात राजीनामा देईल, अब्दुल सत्तारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार आदित्य ठाकरेंमध्ये चांगलीचं जुंपली आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यावरुन राज्य सरकार (Maharashtra Governemnt) आणि विरोधकांमध्ये चांगलीचं जुपली आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेत ओला दुष्काळ करण्यची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच शिवसेना प्रमुख उध्दव टाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा (Marathwada) दौरा केला. या सर्व घडामोडींनंतर राज्य सरकारकडे (Maharashtra Governemnt) ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. तरी यावरुन राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि आमदार आदित्य ठाकरेंमध्ये (Aditya Thackeray) चांगलीचं जुंपली आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी (Worli) मधून राजीनामा द्यावा. मी सिल्लोड (Sillod) मधून देतो, मग समोरासमोर लढाई होऊनच जाऊ द्या, असे आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. मी आठ दिवसांत राजीनामा द्यायलाही तयार आहे, असे सत्तार यांनी सांगितले.
पण अब्दुल सत्तारांनी दिलेल्या या ओपन चॅलेंजवर (Open Challenge) आदित्य ठाकरे काय प्रतिक्रीया देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तरी उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अडीच तासांच्या दौऱ्यात असं नेमक काय बघित की त्यांना एवढी कळकळ जाणवली असा सवाल अब्दुल सत्तारांनी (Adul Sattar) उपस्थित केला आहे. एवढचं नाही तर विरोधकांना त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. (हे ही वाचा:- Nana Patole On State Government: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदनांबाबत राज्य सरकार असंवेदनशील, नाना पटोलेंचे वक्तव्य)
शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी पेक्षा जास्त मदत आतापर्यंत केली आहे. आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे आले की शेतकऱ्यांना मदत मिळेल. नुकसान झालेला एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)