Aaditya Thackeray to Visit Ayodhya: आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेना नेते अयोध्येत दाखल, संजय राऊत, एकनाथ शिंदे यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद
या दौऱ्यापूर्वी शिवसेना नेते अयोध्येत पोहोचले आहेत. या नेत्यांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत एकनाथ शिंदे (Eknath Shinde), वरूण सरदेसाई, सुरज चव्हाण, अनिल तिवारी यांचा समावेश आहे. या नेत्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या दौऱ्यापूर्वी अयोध्येत पाहणी व तयारी आढावा घेतला.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येत्या 15 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Aaditya Thackeray to Visit Ayodhya) आहेत. या दौऱ्यापूर्वी शिवसेना (Shiv Sena) नेते अयोध्येत पोहोचले आहेत. या नेत्यांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), वरूण सरदेसाई, सुरज चव्हाण, अनिल तिवारी यांचा समावेश आहे. या नेत्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या दौऱ्यापूर्वी अयोध्येत पाहणी व तयारी आढावा घेतला. या वेळी संजय राऊत आणि इतरांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. दरम्यान, या सर्व घडामोडींची माहिती संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही दिली.
संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ''आज अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.अत्यंत सकारात्मक ऊर्जा असलेले हे तीर्थस्थान आहे.माझ्यासोबत श्री. एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई,सूरज चव्हाण,अनिल तिवारी,जीवन कामत होते.15 तारखेस अयोध्येत अदित्य ठाकरे यांचे आगमन होत.त्या सोहोळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जय श्रीराम!'' (हेही वाचा, Aaditya Thackeray Ayodhya Visit: आदित्य ठाकरे यांचा अयोद्धा दौरा 10 जूनला; शिवसेना, युवासेना सोबतीला)
संजय राऊत यांनी अयोध्या दौऱ्याशीच संबंधित केलेल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''अयोध्येत ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण कार्य सुरू आहे तेथे भेट दिली. महाराष्ट्राचे अनेक अभियंते निर्माण स्थळी काम करीत आहेत.हजारो करसेवक तसेच शिवसैनिकांच्या बलिदानाचे सार्थक झाले..याचा आनंद झाला.. 15 तारखेस आदित्य ठाकरे या ठिकाणी भेट देतील''.
संजय राऊत यांनी या वेळी सांगितले की, येत्या 15 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला येत आहेत. हे केवळ शक्तिचे प्रदर्शन नाही. हे श्रद्धेचे दर्शन आहे. आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही येथे व्यक्त करु. आदित्य ठाकरे अयोध्येत येत आहेत. त्यामुळे लोकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या दौऱ्याचे लखनऊपासूनच स्वागत होताना आपल्याला दिसेल, असेही संजय राऊत म्हणाले.