आदित्य ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री? महाशिवआघाडीच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचे वाटप सांगणारी फेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
विधानसभा अध्यक्ष पदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) असतील असाही दावा या पोस्ट मध्ये करण्यात आला आहे.
Fact Check: शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष (Maharashtra Political Crisis) शिगेला पोहचला आहे. याबाबत महाआघाडीच्या कोअर कमिटीची संध्याकाळी 4 वाजता बैठक होणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घोषित करण्यात येणार आहे. एकूणच सत्तास्थापनेच्या संदर्भात ठोस निर्णय अजूनही समोर आलेला नाही मात्र एका व्हायरल पोस्टनुसार राज्याच्या मंत्रिमंडळाची वर्गवारी देखील सांगण्यात आली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यानुसार, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेचे सरकार आल्यास आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) हे मुख्यमंत्री, अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री म्ह्णून नेमले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष पदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) असतील असाही दावा या पोस्ट मध्ये करण्यात आला आहे.
व्हायरल पोस्ट मध्ये महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचे वर्गवारी देखील सादर करण्यात आली आहे, ज्यानुसार, विधानसभा उपाध्यक्ष म्ह्णून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, गृहमंत्री म्ह्णून राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना महसूल खाते देण्यात येणार आहे.
पहा व्हायरल पोस्ट
सध्या राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये ही पोस्ट देखील फेसबुक व्हाटसऍप सहित सर्वत्र जोरदार व्हायरल झाली असून अनेकजण यावर विश्वासही ठेवत आहेत. मात्र अद्याप अशा प्रकारची कोणतीही अधिकृत घोषणा झालेले नाही त्यामुळे ही पोस्ट पूर्णपणे खोटी आहे.
2020 मध्ये पुन्हा होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक? काँग्रेस नेते संजय निरुपम यांची भविष्यवाणी
व्हायरल फेसबुक पोस्ट
दरम्यान, आज संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत राजभवनावर शिवसेनेला बहुमताचा आकडा सिद्ध करायचा आहे अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. माध्यमांच्या माहितीनुसार शिवसेना 5 वाजता राजभवनावर राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहे.