Shiv Sena (UBT) March On BMC on July 1: उद्धव ठाकरे यांची घोषणा, Aaditya Thackeray यांच्या नेतृत्वात शिवसेना (UBT) चा मुंबई मनापावर विराट मर्चा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ShivSena Uddhav Balasaheb Thackeray) पक्ष येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर (BMC) विराट मोर्चा (Shiv Sena (UBT) March on BMC on July 1) काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि इतर प्रमुख नेते करणार आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ShivSena Uddhav Balasaheb Thackeray) पक्ष येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर (BMC) विराट मोर्चा (Shiv Sena (UBT) March on BMC on July 1) काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि इतर प्रमुख नेते करणार आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते आज (मंगळवार, 20 जून) बोलत होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्याउलट पालिकेत मनामानी कारभार मात्र सुरु आहे. महापालिकेचा पैसा अत्यंत मनमानी पद्धीतीने वापरला जातो आहे. पालिकेच्या कारभारावर कोणाचाही अंकूश नाही. हा सर्व प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांची उधलपट्टी आहे. त्यामुळेच हा जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, शिवसेनेचा काल वर्धापन दिन झाला. या वर्धापन दिनामध्ये जे बोलायचे ते मी बोललो. मात्र, प्रदीर्घ काळानंतर मुंबईतील नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. मात्र, पाऊस जसा लांबणीवर पडला आहे. तशाच पद्धतीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत. अशा स्थितीत लोकांची कामे कशी करायची हाच मोठा प्रश्न आहे. मुंबई महापालिकेवर कोणाचीह अंकूश नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या पैशांचा वारेमाप पद्धतीने वापर केला जातो आहे. अक्षरश: उधळपट्टी सुरु आहे. मुंबईला कोणी मायबापच राहिला नाही. त्यामुळे पालिकेची ही लूट थांबविण्यासाठी आम्ही एत्या एक जुलै रोजी मोठा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघेल, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, International Traitor Day: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह गद्दारीला उत्तेजन देतात- संजय राऊत (Watch Video))
व्हिडिओ
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई येथे शिवसेना (UBT) गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. शिवसेना भवन येथे पार पडलेल्या या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. आगामी महापालिकेच्या दृष्टीने आढवा घेण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)