Aaditya Thackeray Ayodhya Visit: आदित्य ठाकरे यांचा अयोद्धा दौरा 10 जूनला; शिवसेना, युवासेना सोबतीला

‘असली आ रहा है, नकली से सावधान’ अशा संदेशासह एक पोस्टर झळकलं आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credit: Facebook)

भारतात सध्या देव-धर्माच्या नावावरून राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. एकीकडे राज्यात हनुमान चालीसा, अजान, भोंगे यावरून राजकारण सुरू असताना अयोद्धा दौरे सुरू झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या 5 जूनच्या अयोद्धा दौर्‍यानंतर आता शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) देखील अयोद्धा दौरा करणार आहेत. आज संजय राऊत, शिवसेना प्रमुख प्रवक्ते यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली 10 जूनला शिवसेना, युवासेना कार्यकर्ते अयोद्धा दौर्‍यावर येणार आहेत. संजय राऊतांनी माहिती देताना हा दौरा राजकीय नसेल असे देखील सांगितले आहे.

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मनसेमुळे महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेना हिंदुत्त्वाच्या मुद्दयावरून मागे फिरली का? असा सवाल विचारला जात होता. हनुमान जयंतीला देखील पुण्यात मनसे कडून आरत्यांचे कार्यक्रम झाले तर मुंबईत शिवसेनेनं ठिकठिकाणी मंदिरात जाऊन आरती केली होती.

अयोद्धेमध्ये सध्या मनसे-शिवसेना पोस्टर वॉर देखील रंगल्याचं दिसलं आहे. ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ अशा संदेशासह एक पोस्टर झळकलं आहे. यावर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेबांच्या फोटोसह प्रसिद्ध झाले आहे. संजय राऊतांनी हे पोस्टर कुणी लावलं हे ठाऊक नसल्याचं म्हटलं आहे. Brijbhushan Singh On Raj Thackeray: राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी समोर आले ब्रिजभूषण सिंह यांचे हे पोस्टर, लिहिले- माफी मागा नाहीतर परत जा .

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब  नोव्हेंबर 2018 मध्ये अयोध्येच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे होते. आता  पुन्हा ते अयोद्धा दौर्‍यावर जात आहे. यावेळेस शिवसेना खासदार, आमदार, युवासेना पदाधिकारी त्यांच्यासोबत असणार आहेत.