धक्कादायक! बीड जिल्ह्यातील महिलेचे 21 वे बाळंतपण; 38 व्या वर्षी 11 मुले व 18 नातवंडे, प्रशासनही चक्रावले
बीडच्या माजलगावपासून दोन किलोमीटर अंतरावरील केसापुरी वसाहतीत ही महिला राहते. आश्चर्य म्हणजे या महिलेची 20 बाळंतपणे ही घरीच झाली आहेत. यावेळी पहिल्यांना तिला रुग्णालयात दाखल केले गेले आहे.
भारत देश हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आपण जाणतोच, याचमुळे लोकसंख्या नियंत्रणाच्या अनेक योजना राबवल्या जातात. मात्र 21 व्या शतकात महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील एका महिलेचे चक्क 21 वे बाळंतपण चालू असल्याचे समोर येत आहे. बीडच्या माजलगावपासून दोन किलोमीटर अंतरावरील केसापुरी वसाहतीत ही महिला राहते. आश्चर्य म्हणजे या महिलेची 20 बाळंतपणे ही घरीच झाली आहेत. यावेळी पहिल्यांना तिला रुग्णालयात दाखल केले गेले आहे.
लंकाबाई खरात असे या महिलेचे नाव असून, मालोजी देविदास खरात असे त्यांच्या पतीने नाव आहे. हे कुटुंब केसापुरी वसाहतीत पाल ठोकून राहते. लंकाबाई यांना आधीच नऊ मुली आणि दोन मुले अशी 11 अपत्ये आहेत. त्यांची नऊ अपत्ये बाळंतपणानंतर दगावली. आता त्या 21 व्या वेळा बाळंत आहेत. ही बातमी जेव्हा आरोग्य विभागाला समजली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी ताबडतोब लंकाबाई यांची भेट घेऊन त्यांना सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. या दरम्यान त्यांची तपासणी केली असता सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचे दिसून आले आहे.
सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी महाराष्ट्रातच शाळा सुरु केल्या. आज स्त्री शिक्षणामुळे अंतराळात जात आहे मात्र अजूनही असे अनेक गावे आहेत जिथे 12-15 बाळंतपणे ही खूप छोटी गोष्ट समजली जाते. लंकाबाई याचे चांगले उदाहरण आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांची 10 पेक्षा जास्त बाळंतपणे झाली आहे आणि त्या पुढच्या मुलाचा विचार करीत आहे. जोपर्यंत अशा तळागाळात शिक्षण पोहचत नाही तोपर्यंत केंद्राने कितीही योजना बनवल्या त्याचा काहीच फायदा होणार नाही.