ठाण्यातील घोडबंदर रोडवर केमिकल ट्रक पलटला; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
या ट्रकमधून मेथाईल मेथक्रिलेट (Methyl Methacrylate) ची वाहतूक करण्यात येत होती. घोडबंदर रोडवरील गायमुख चौपाटीजवळ (Gaimukh Chowpatty) ही घटना घडली.
ठाण्यातील (Thane) घोडबंदर रोडवर (Ghodbunder Road) केमिकल ट्रक पलटल्याची घटना घडली आहे. या ट्रकमधून मेथाईल मेथक्रिलेट (Methyl Methacrylate) ची वाहतूक करण्यात येत होती. घोडबंदर रोडवरील गायमुख चौपाटीजवळ (Gaimukh Chowpatty) ही घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताचं घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. (हेही वाचा - ठाणे: Kanpur Encounter Case मधील विकास दुबे चा साथीदार अरविंद सोबत त्याचा ड्रायव्हरला मुंबईच्या ATS Juhu Unit कडून अटक)
सध्या अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, टँकर बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, दोन वर्षापूर्वी ठाणे- घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटल्याची घटना घडली होती. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती.