New Mumbai: सानपाडा येथे ट्रकने धडक दिल्याने सायन येथील रहिवाशाचा मृत्यू; चालकाला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत गजानन पाटील असे मृताचे नाव असून तो सायनमधील प्रतीक्षा नगर येथील रहिवासी होता.
New Mumbai: गेल्या आठवड्यात सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा (Sanpada) येथे वाहनाच्या धडकेत एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर 39 वर्षीय ट्रकचालकाला अटक करण्यात आली. ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन ऑटोरिक्षांचेही नुकसान झाले होते. फजल मुल्ला असे आरोपी चालकाचे नाव असून त्याला सानपाडा पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत गजानन पाटील असे मृताचे नाव असून तो सायनमधील प्रतीक्षा नगर येथील रहिवासी होता. प्रशांत एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याचा मित्र आकाशसोबत तळोजा येथे आला होता. (हेही वाचा -Road Accident in Maharashtra: गेल्या 3 वर्षांत महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2,000 हून अधिक; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक अपघाताची नोंद)
परतत असताना तळोजा येथून कॅब घेऊन तो सानपाडा महामार्गावर उतरला. प्रशांतचा मित्र आकाश रस्त्यापासून थोडा दूर गेला. यावेळी प्रशांत बसस्थानकावर फोनवर बोलत होता. यावेळी अचानक ट्रक आला आणि त्याने दोन रिक्षांना धडक देण्यापूर्वी प्रशांतला धडक दिली.
या धडकेत प्रशांत पाटील गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर सानपाडा पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली.