मुंबई: अंधेरी भागातून ड्रग्ज पेडलर अकबर चौखट ला अटक, 5 लाखांच्या MD ड्रग्जचा साठा जप्त

आतापर्यंत मुंबईतून अनेक ड्रग्ज पेडलर्सला अटक झाल्याने मुंबईत पसरलेले मोठे ड्रग्ज रॅकेट समोर येत आहे.

Drugs Representative Image (Photo Credits: PixaBay)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पोलिसांनी छापे टाकून अमली पदार्थांचा साठा जप्त केला. यात मुंबईत तर पोलिसांनी धडक मोहिम सुरु आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या अंधेरी भागातून एका ड्रग्ज पेडलरला (Drugs Peddler) अटक करण्यात आली आहे. अकबर चौखट असे आरोपीचे नाव आहे. या ड्रग्ज पेडलरकडून 5 लाख किंमतीचे MD ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला आहे. नारकोटिक्स सेंट्रल ब्युरोच्या (NCB) अधिका-यांनी याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत मुंबईतून अनेक ड्रग्ज पेडलर्सला अटक झाल्याने मुंबईत पसरलेले मोठे ड्रग्ज रॅकेट समोर येत आहे.

दरम्यान रविवारी (21 फेब्रुवारी) ला मुंबईच्या डोंगरी भागात 25 किलोचा मेफेड्रॉन ड्रग्जसाठा (Mephedron Drugs) जप्त करण्यात आला असून याची किंमत जवळपास 12.5 कोटी इतकी आहे. यात एकाला अटक देखील करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपीकडून 5 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर सलग एक दिवसाने मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा हस्तगत करण्यात आला आहे.हेदेखील वाचा- मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून अनेक ठिकाणी NCB चे छापे; आतापर्यंत 100 ग्रॅम मेफेड्रोन, 1.034 किलो सायकोट्रॉपिक औषधे जप्त

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर मुंबईतील ड्रग्ज रॅकेट समोर आले आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकारांना देखील अटक झाली. हे जाळ कुठे आणि किती प्रमाणात पसरलेले आहे याचा अंदाज मुंबईत सापडल्या जाणा-या ड्रग्ज साठ्यावरुन येत आहे. तसेच यादरम्यान अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सकडून त्यांच्या साथीदारांची माहिती मिळत आहे.

महिन्याभरापूर्वी मुंबईच्या मिरारोड परिसरातील एका हॉटेलमध्ये छापा टाकला. या छाप्यात ड्रग्जचा पुरवठा करणारा चांद मोहम्मद याला रंगेहात पकडण्यात आले.