Animal Abuse Video: ग्रुमिंग सेंटरवर कर्मचाऱ्याने केली कुत्र्यांवर अत्याचार, विचलित करणारा Video आला समोर; गुन्हा दाखल

ठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एका ग्रुमिंग सेंटरवर आलेल्या कुत्र्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता.

Dog | Representational image (Photo Credits: pxhere)

Animal Abuse Video: ठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एका ग्रुमिंग सेंटरवर आलेल्या पाळीव कुत्र्यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता. दरम्यान अशीच घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील ग्रुमिंग सेंटरवर कुत्र्याच्या एका लहान पिल्लूवर अत्याचार आणि बेदम मारहाण करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- दक्षिण कोरियांमध्ये 1000 कुत्र्यांचा अत्याचारामुळे मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील एका ग्रुमींग सेंटरवरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रुमिंग सेंटरच्या मालकांना सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर हा प्रकार समोर आला आहे. या सेंटरवर ऋषी काम करायाचा. त्यांच्या अनेक तक्रार मालकाकडे येऊ लागल्या. त्यामुळे मालकाने सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी हा संतापजनक प्रकार उघडला. प्राण्यांना अंघोळ आणि त्यांची इतर सेवा करताना त्यांने पाळीव प्राण्यांना बेदम मारहाण केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by StreetdogsofBombay (@streetdogsofbombay)

ग्रुमिंग सेंटरच्या मालकांनी हा प्रकार उघडल्यानंतर ऋषीला कामावरून निलंबित केले आहे. पेटा (PETA) यांच्या मार्गदर्शनानंतर मालकांनी या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. ऋषीविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.