Bridge Collided in Maval Taluka: मावळ तालुक्यात नदीपात्रात बांधलेला पूल कोसळला; 8 गावांशी तुटला संपर्क
पुल कोसळल्याने बुधवाडी, वाडीवळे, नेसावे, खांडशी, वलख, सांगिसे, वेल्हेवली, उंबरवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे.
Bridge Collided in Maval Taluka: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. पुण्यातील मावळ तालुक्यातही (Maval Taluka) मुसळधार पाऊस पडत असून नदीपात्रात बांधलेला पूल कोसळला (Bridge Collided) आहे. अपघातामुळे जवळपासच्या आठ गावांशी संपर्क होऊ शकलेला नाही.
मावळातील वाडीवळे गावाजवळील नदीपात्रात हा पूल बांधण्यात आला असून गुरुवारी मुसळधार पावसामुळे तो कोसळला. पुल कोसळल्याने बुधवाडी, वाडीवळे, नेसावे, खांडशी, वलख, सांगिसे, वेल्हेवली, उंबरवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. (हेही वाचा - BMC On Road-Potholes: मुंबईत लवकरच खड्डे मुक्त रस्ते! पालिका वापरणार भन्नाट आयडिया)
नदीपात्रात बांधलेला पूल कोसळल्याने या गावांतील लोकांना मुंढवरे-वालख रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. या रस्त्यावरून नागरिकांना सुमारे 15-20 किलोमीटर जादा प्रवास करावा लागतो. पावसाळा येण्यापूर्वी या रस्त्यांच्या डागडुजीचे काम करणे अत्यावश्यक होते, मात्र महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळाने याकडे डोळेझाक केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यात विविध जिल्ह्यात मान्सूने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. याशिवाय पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.