लोणावळा येथे दरड कोसळण्याने सह्याद्री एक्सप्रेसचा खोळंबा; 3 तासांनंतर वाहतूक सुरळीत
काल (13 जून) रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास लोणावळा येथे रेल्वे ट्रॅकवर एक बोल्डर पडला
नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे रेल्वे सेवेचा खोळंबा होण्यास सुरुवात झाली आहे. काल (13 जून) रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास लोणावळा येथे रेल्वे ट्रॅकवर एक दरड पडली. यामुळे मुंबई-कोल्हापूर 11023 सह्याद्री एक्सप्रेसला सुमारे 2 तास उशीर झाला. मात्र त्यानंतर तातडीने रेल्वे प्रशासनाने काम हाती घेत सर्व मार्गांवरील वाहतूक सुरळीत केली. केवळ 3 तासांत म्हणजे रात्री 11 पर्यंत सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
ANI ट्विट:
या घटनेचा व्हिडिओ मध्य रेल्वेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सर्व प्रकारामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.