चहा प्रेमींसाठी एक वाईट बातमी; टपरी वरील चहा आता अजून महागणार
या संस्थेने त्यांच्या सर्व सदस्यांना चहाचे दार वाढवण्यास सांगितले आहे. या संस्थेने चहाची किंमत 1 ते 2 रुपयांपर्यंत वाढ करण्यास सांगितले आहेत.
Tea Price To Increase: पेट्रोल, कांदे आणि टोमॅटो या सर्वाच्या वाढलेल्या दरांनंतर, चहा प्रेमींसाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे ती म्हणजे तुमच्या जवळील चहाच्या टपरी वर मिळणाऱ्या कटिंगची किंमत आता वाढणार आहे. चहा आणि कॉफी असोसिएशन हे मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास 5000 हून अधिक चहा टपरी व चहा विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करते. या संस्थेने त्यांच्या सर्व सदस्यांना चहाचे दर वाढवण्यास सांगितले आहे. या संस्थेने चहाची किंमत 1 ते 2 रुपयांपर्यंत वाढ करण्यास सांगितले आहेत.
या असोसिएशनने म्हटले आहे की दूध, साखर, चहाची पाने आणि एलपीजीच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे, चहाची किंमत वाढवणे आवश्यक आहे. यामुळे विक्रेत्यांचा नफा कमी होणार नाही.
असोसिएशनचा सल्ला मानणे हे सदस्यांना बंधनकारक नसतानाही, त्याकडे गांभीर्याने पाहिले जावे अशी मागणी असोसिएशनने केली आहे. चार वर्षांपासून अस्तित्वात आलेली टीसीए ही असोसिएशन चहा विक्रेत्यांना वित्तपुरवठा, स्वच्छता आणि ग्राहकांचा सल्ला देत आहे.
दरम्यान, कामाला जाणारा मुंबईकर हा दिवसभरात सरासरी चार ते पाच कप चहा घेतो. म्हणजे त्याचा चहावरील खर्च दिवसाला 5 ते 10 रुपयांनी वाढेल.
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अन्नधान्य चलनवाढीचा दर नोव्हेंबरमध्ये 11.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत ही वाढ 2 टक्क्यांनी वाढली आहे.
तुम्ही चहाप्रेमी असाल तर नक्की जाणून घ्या चहाचे हे काही फायदा
टीसीएचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, जर विक्रेत्यांनी किंमती वाढवली नाही तर त्यांच्या उत्पादनाचा दर्जा घसरेल. ते म्हणाले, “अर्ध्या लिटर दुधाची किंमत 2 रूपयांनी वाढली आहे, चहाच्या पानांची किंमत प्रति किलो 25 ते 30 रुपयांनी वाढली आहे, साखरेची किंमतही 2 रुपये प्रतिकिलोने वाढली आहे. त्यामुळे, आमचे सदस्य जो चहा विकत आहेत तो पिण्यासाठी योग्य नाही."