पुण्यात 68 वर्षीय COVID-19 रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या 100
यामुळे पुण्यात मृतांचा एकूण आकडा 100 वर जाऊन पोहोचला आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तसेच राज्यात कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेत मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार पुण्यात 68 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पुण्यात मृतांचा एकूण आकडा 100 वर जाऊन पोहोचला आहे. या रुग्णाचे मायोकार्डिटिससह ARDS निकामी झाल्याने त्यांना शवसानाचा त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा 11,506 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे 485 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत (Mumbai) काल कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 751 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधितांची संख्या 7 हजार 625 वर पोहचली आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार COVID-19 संक्रमितांची एकूण आकडेवारी, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर
तर भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 35,365 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. यात उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आलेल्या 9064 जणांचाही समावेश आहे. तसेच देशभरातील कोरोना संक्रमित मृतांची एकूण संख्या 1152 झाली आहे.
जगभरात कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 31 लाख 93 हजार 886 इतकी असून आतापर्यंत 2 लाख 27 हजार 638 नागरिकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 9 लाख 72 हजार 719 रुग्ण कोविड 19 च्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.