7th Pay Commission: राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी 5 हप्त्यात मिळणार; 3 लाख 29 हजार 548 कर्मचाऱ्यांना होणार लाभ

त्यामुळे याचा राज्यातील 3 लाख 29 हजार 548 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

Education Minister Varsha Gaikwad (PC - MahaDGIPR)

7th Pay Commission: राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमधील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी 5 समान वार्षिक हप्त्यात मिळणार आहे. त्यामुळे याचा राज्यातील 3 लाख 29 हजार 548 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ कॉलेज, अध्यापक विद्यालय कॉलेज, सैनिकी शाळा, महानगरपालिका, नगर परिषदा व नगरपंचायतीमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. (हेही वाचा - Sarkari Naukri 2020 Western Railway Recruitment: तुम्ही इयत्ता 10 उत्तीर्ण आहात? तुमच्याकडे ITI प्रमाणपत्र आहे? मग तुम्हाला रेल्वे कर्मचारी होण्याची संधी आहे!)

भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकबाकी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच या व्यतिरिक्त परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असणारे आणि अंशत: अनुदानित शाळामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम रोख स्वरुपात मिळणार आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.