7th Pay Commission: महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सह 6 अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 नोव्हेंबर पासून लागू होणार

महाराष्ट्रामध्ये आता अकृषी विद्यापीठांमध्येही शिक्षकेतर कर्मचार्‍यांनादेखील सातवा वेतन आयोग ( 7 th Pay Commission) लागू करण्याचा निर्णय झाला आहे.

Indian Currency | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये आता अकृषी विद्यापीठांमध्येही शिक्षकेतर कर्मचार्‍यांनादेखील सातवा वेतन आयोग ( 7 th Pay Commission)  लागू करण्याचा निर्णय झाला आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून सुधारित वेतन श्रेणी पुढील महिन्यांपासून म्हणजेच 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती आणि नागपूर या 6 विद्यापीठांमधील कर्मचार्‍यांना फायदा होणार आहे. 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत 'इतका' मिळतो घरभाडे भत्ता; जाणून घ्या एचआरए कॅलकुलेशन नियम

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती आणि नागपूर या 6 विद्यापीठांमध्ये विद्यापीठ स्तरांवर मुद्रणालयं आहेत. त्यामध्ये काम करणार्‍यांना विद्यापीठ निधीमधून वेतन दिले जाते. तसेच सुधारित वेतनश्रेण्या शासन स्तरावरून दिल्या आहेत.दरम्यान येथे 5व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी आधारभूत मानून समकक्ष वेतनश्रेणी 6 व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी 1 जानेवारी 2006 पासून देण्याचा तर समकक्ष 7व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू करण्याला मान्यता देण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी ही 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू होईल. असे राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. State Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर

दरम्यान राज्यातील 6 विद्यापीठांमधील कर्मचार्‍यांना नवा सातवा वेतन आयोगामुळे पगार द्यावा लागणार असल्याने प्रतिवर्षी सुमारे 268 कोटींचा अधिक भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now