Rs.71000 Food Order: बॉस असावं तर असा! बॉसकडून कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ७१ हजारांच्या जेवण ऑर्डर

पुण्यातील एका कंपनीच्या बॉसने स्वतच्या कर्मचाऱ्यांसाठी दोन चार हजारांचं नाही तर तब्बल ७१ हजारांचा स्विगीवर फुड ऑर्डर करत सगळ्या बॉसचा विक्रमचं मोडला आहे म्हणायचा.

Swiggy (Photo Credits: PTI)

बॉस हो तो येसा, असचं काहीसं म्हणण्याची वेळ आली आहे. जगातील कुठल्याही कर्मचाऱ्यांना आपला बॉस खुप आवडीचा असं तुरळकचं. कुणी बॉस सुट्टी देत नाही तर कुणी इन्क्रीमेंट किंवा कुणी नको त्या वेळी काम लावतो म्हणुन माझा बॉस फारचं खडूस आहे यार हा शब्द तुम्ही किमान एकदा तरी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या तोंडून ऐकला असाल. पण पुण्याच्या एका बॉसची सध्या सोशल मिडीयावर हवा झाली आहे. किंबहुना असा बॉस सगळ्यांना मिळो अशी प्रार्थनाचं जणू प्रत्येक कर्मचारी करत आहे. पुण्यातील एका कंपनीच्या बॉसने स्वतच्या कर्मचाऱ्यांसाठी दोन चार हजारांचं नाही तर तब्बल ७१ हजारांचा स्विगीवर फुड ऑर्डर करत सगळ्या बॉसचा विक्रमचं मोडला आहे म्हणायचा. काही कर्मचाऱ्यांच्या नशीबात तर ऑफिसमध्ये पार्टी देखील नशीबात नसते आणि झाली कधी चुकुन पार्टी तर स्वतच्या पैशाने करावी लागते.

 

पण असा बॉस मिळाला तर जो थेट ७१ हजारांचा फुड ऑर्डर करत आपल्या कर्मचाऱ्यांना पार्टी देतो. तरी ७१ हजारांच्या या फुड ऑर्डरमध्ये या बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बर्गर आणि फ्राइज मागवले होते. तर हा ७१ हजारांचा ऑर्डर एकाचं वेळी केलेला ऑर्डर नसुन २०२२ या वर्षभरात आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल ७१ हजारांचं जेवण खिलवत पार्टी दिली आहे. (हे ही वाचा:- Swiggy Layoffs: Zomato नंतर 'स्विगी' या महिन्यात देणार 250 कर्मचाऱ्यांना नारळ)

 

स्विगीने आपला २०२२ या वर्षातील आपला वार्षिक अहवाल सादर केला आहे. तरी या अहवालातून ही महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. ७१ हजारांचा फुड ऑर्डर करणारा हा व्यक्ती पुण्यातील एका खासगी कंपनीचा मालक आहे. तसेच देशातील सर्वाधिक किमतीचा स्वीगीवर फुड ऑर्डर करणार हा व्यक्ती देशातील दुसरा व्यक्ती आहे. सर्वाधिक स्वीगी फुड ऑर्डर करणार व्यक्ती बंगळूरुचा असुन त्याने स्वीगीवर वर्षभरात तब्बल ७५ हजारांचं जेवण मागवलं आहे.