लज्जास्पद! नेरुळ रेल्वे स्थानकात 65 वर्षाच्या वृद्धाने कुत्र्यावर केला बलात्कार, सीसीटीव्हीच्या फुटेज पाहून आरोपीला अटक
वासनेच्या अधीन गेलेल्या या आरोपीला अटक करुन पोलिस अधिक तपास करत आहे.
माणुसकीला काळिमा फासणारी घटना नवी मुंबईत (Navi Mumbai) घडल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईच्या नेरूळ (Nerul) स्थानकामध्ये एका कुत्रीवर (Female Dog) 65 वर्षाच्या वयोवृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. TOI ने दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व किळसवाणा प्रकार रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्यामुळे आरोपीची ओळख पटवून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र पवार असे या आरोपीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वासनेच्या अधीन गेलेल्या या आरोपीला अटक करुन पोलिस अधिक तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी केलेल्या तपासात आरोपीने रात्रीच्या वेळी हा प्रकार केला आहे. मात्र आधीच्या तपासात आरोपी घटनास्थळी आढळून आला नसल्याचे दिसत होते. मात्र त्यानंतर एका स्थानिकाने फोन करुन घटनास्थळी तोच असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा छडा लावला. याबाबत आरोपीकडून अधिक चौकशी केली जात आहे. धक्कादायक! ठाण्यात 40 वर्षांच्या व्यक्तीने केला कुत्रीवर बलात्कार; पोलिसांकडून गुन्हा दाखल
महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांसोबत प्राण्यांवर बलात्कार होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी ठाण्यामध्ये 40 वर्षीय व्यक्तीने कुत्रीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तसेच उत्तर प्रदेशातही 4 वर्षाच्या पाळीव कुत्रीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला होता. थोडक्यात प्राण्यांवर पाशवी बलात्कार केल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यावर सरकारने कठोर पावले उचलावीत अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
दरम्यान पालघर (Palghar) जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरे चारण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये ही घटना घडली आहे.