Sangli Accident News : भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळून ६ जणांचा मृत्यू, सांगलीतील घटना

भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. तासगाव-मणेराजुरी मार्गावर भीषण अपघात झाला.

Photo Credit- X

Sangli Accident News : भरधाव कार कॅनॉलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यात घडली. सुदैवाने यात एक महिला बचावली, ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचणी तासगाव - मणेराजुरी मार्गावर रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात (Road Accident) झाला. अपघातावेळी ऑल्टो कार वेगात होती. ती थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये जोरदार आदळली आणि सहा जणांचा मृत्यू झाला.

कार चालकाच्या चालकाच्या चुकीमुळे कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला.

राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ६०) सुजाता राजेंद्र पाटील (वय ५५) प्रियांका अवधूत खराडे (वय ३०) राजीव विकास पाटील (वय २) ध्रुवा पाटील (वय ३) कार्तिकी (वय १) अशी मृतांची नावे आहेत. तर स्वप्नाली विकास भोसले (वय ३०) असं जखमी महिलेचं नाव आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अपघाताची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ते घटनेचा तपास करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif