Coronavirus in Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात 511 नवे कोरोना बाधित रुग्ण; 7 पोलिसांचा मृत्यू
पोलिसांभोवतीही कोरोनाचा तीव्र वेढा बसला आहे. मागील 24 तासांत 511 पोलिस कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असलेल्या पोलिसांवरील भार कोविड-19 (Covid-19) संकटात अधिक वाढला. महाराष्ट्र पोलिसांभोवतीही कोरोनाचा तीव्र वेढा बसला आहे. मागील 24 तासांत 511 पोलिस कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे पोलिस दलातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 16,912 झाला आहे. त्यापैकी 3,020 अॅक्टीव्ह रुग्ण असून 13,719 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना संसर्गामुळे एकूण 173 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. (महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती गेले कोरोनाचे बळी; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी)
कोवि़ड-19 लॉकडाऊन काळात पोलिसांवरील ताण अधिक वाढला होता. जीवावर उदार होत कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना बाधित पोलिसांना योग्य सेवा-सुविधा मिळाव्यात याकडे गृहखात्याचे लक्ष होते. दरम्यान कोरोनावर मात करुन पुन्हा कामावर रुजू होणाऱ्या पोलिसांचे जंगी स्वागतही करण्यात आले. लॉकडाऊन काळात केलेल्या कामाचा आढावा दर्शवणारी डॉक्युमेंटरीही तयार करण्यात आली आहे.
ANI Tweet:
सध्या अनलॉक 4 ला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बंद असलेल्या अनेक सेवा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. मात्र कोरोनाचे संकट टळले नसल्याने गर्दी टाळणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याकडे पोलिसांना बारीक लक्ष द्यावे लागणार आहे. दरम्यान नागरिकांनी देखील सामाजिक भान दाखवत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.