मुंबई: चेंबुर मधील नवजात बाळ आणि आईची कोरोना चाचणी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये निगेटीव्ह

त्याचबरोबर खबरदारी म्हणून महिलेच्या पतीस बिलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

साई रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकास आणि त्याच्या आईस कोरोनाची लागण झाल्याची बातमी ऐकायला मिळाली होती. मात्र या खाजगी रुग्णालयातून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे पुन्हा त्यांची चाचणी केल्यानंतर या दोघांचे सर्व कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, साई रुग्णालयातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या बेडवर या नवजात बालकास आणि त्याच्या आईस ठेवल्यामुळे या दोघांना कोरोनाची लागण झाली अशी बातमी यांच्या कुटूंबाने दिली होती. मात्र कस्तुरबा रुग्णालयातील या दोघांचे सर्व कोरोना रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.  5 दिवसांचे हे नवजात बाळ आणि आई दोघे सुखरुप असल्याचे रुग्णालयातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

तरीही नवजात बालकाच्या आणि आईच्या सुरक्षेच्या दृष्टीने कस्तुरबा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर खबरदारी म्हणून महिलेच्या पतीस बिलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. मुंबई: 3 दिवसांच्या बाळाला कोरोनाच्या संसर्गानंतर चेंबुर मधील साई हॉस्पिटल पूर्ण बंद; Covid 19 चा संसर्गाच्या केस असणार्‍या सैफी, जसलोक, हिंदुजा, भाभा हॉस्पिटलमध्येही अंशतः रूग्णसेवा खंडित

चेंबुरमधील साई हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित नवजात बालकाचा जन्म 26 मार्च दिवशी झाला. त्यानंतर मंगळवारी नवजात बालक आणि माता या दोघांनाही कुर्लाच्या भाभा हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यावेळेस साई हॉस्पिटल स्वच्छता आणि निर्जुंतिकीकरणासाठी बंद करत असल्याचं कारण पुढे करण्यात आले होते. चेंबुरमधील साई हॉस्पिटल (Sai Hospital Chembur) संपूर्ण सील करण्यात आलं असून येथे निर्जंतुकीकरण सुरु आहे.