Mumbai: धक्कादायक! मालाडच्या मार्वे खाडीत 12 ते 16 वयोगटातील 5 मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, 3 जण बेपत्ता
Mumbai: मालाडच्या मार्वे खाडीत 12 ते 16 वयोगटातील मुलं बुडल्याची घटना रविवारी सकाळी घडली. BMC च्या MFB ने सकाळी या घटनेची नोंद केली आणि तेव्हापासून विविध एजन्सी बेपत्ता शोध घेत असून बचावकार्य सुरु आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ताज्या अपडेटनुसार, बुडलेल्या पाच मुलांपैकी, ब्रिगेडच्या आगमनापूर्वी लोकांनी केलेल्या त्वरीत कारवाईमुळे दोघांना वाचवण्यात यश आले आहे. कृष्णा जितेंद्र हरिजन (वय 16 वर्षे) आणि अंकुश भारत शिवरे (वय 13 वर्षे) अशी सुटका करण्यात आलेल्या दोन मुलांची नावे आहेत. मात्र, अन्य तीन मुलांचा शोध सुरू आहे.
ही घटना समुद्राच्या किना-यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर घडली, ज्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षिततेच्या उपायांबद्दल चिंता निर्माण झाली. ताज्या अपडेटनुसार, फायर अँड रेस्क्यू टीम (FRT) शोध मोहिमेचे नेतृत्व करत आहे, बोटी, लाइफ जॅकेट आणि इतर आवश्यक उपकरणांचा वापर करून हरवलेल्या मुलांचा शोध सुरू आहे. अद्याप बेपत्ता असलेल्या तीन मुलांमध्ये सुभम राजकुमार जैस्वाल (वय 12 वर्षे), निखिल साजिद कायमकूर (वय 13 वर्षे) अजय जितेंद्र हरिजन (वय 12 वर्षे) यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Vardha Shocker: वर्ध्यात धकादायक प्रकार तरुणीच्या अंगावर फेकलं अॅसिड युक्त द्रव, आरोपी पोलीसांच्या ताब्यात)
या दुःखद घटनेला प्रतिसाद म्हणून, शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी अनेक एजन्सी एकत्रित केल्या गेल्या आहेत. या एजन्सींमध्ये BMC चे MFB, पोलीस, तटरक्षक दल, नौदल गोताखोर, 108 रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचारी यांचा समावेश आहे.