पुण्यात 4 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यात COVID-19 बाधित मृतांची एकूण संख्या 99 वर

मुंबईपाठोपाठ पुण्यात (Pune) 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 99 वर पोहोचली आहे.

COVID-19 (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत असून मृतांच्या आकडेवारीही वाढत आहे. राज्यात सद्य स्थितीत 10, 498 कोरोना संक्रमित रुग्ण असून त्यातील 459 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्राने 10 हजारांचा टप्पा पार केला असला तरीही राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत आहे. तसेच अनेक जिल्हे कोरोना मुक्त झाल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितले आहे. सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या असलेल्या मुंबईपाठोपाठ पुण्यात (Pune) 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 99 वर पोहोचली आहे.

मुंबई-ठाण्यात मिळून 8244 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 313 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेने 1459 कंन्टेंटमेंट झोन घोषित केले होते. त्यापैकी 331 जणांना त्यामधून वगळण्यात आले आहे. मात्र 1128 या कन्टेंटमेंट झोनमध्ये 50 टक्के झोपडपट्ट्यांचा आणि रेड झोनचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.Coronavirus: मुंबईत 50 टक्के झोपडपट्ट्यांसह Containment Zone चा आकडा 1 हजाराच्या पार

तर भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 35,043 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 1147 इतकी झाली आहे. ततर 8889 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत देशात 73 रुग्ण दगावले असून 1993 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय आणि वैद्यकिय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

जगभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 33,08,323 वर पोहोचली असून 2,34,112 रुग्ण दगावल्याची माहिती Worldometers ने दिली आहे.



संबंधित बातम्या