Pune: राष्ट्रपती कोविंद पुण्यातील दत्त मंदिराच्या 125 व्या वर्धापन दिन सोहळ्याला राहणार उपस्थित
बुधवार पेठेत दत्त मंदिर असून स्वर्गीय लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांनी 1898 मध्ये मंदिराची स्थापना केली होती.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) शुक्रवारी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या 125 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. बुधवार पेठेत दत्त मंदिर असून स्वर्गीय लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांनी 1898 मध्ये मंदिराची स्थापना केली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) पुढील महिन्यात देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या मूर्ती आणि मंदिराच्या उद्घाटनासाठी पुण्यात येण्याची शक्यता आहे. 27 मे रोजी बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मंदिराच्या 125 व्या वर्धापन दिनाचा शुभारंभ होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील देखील उपस्थित राहणार आहेत, असे ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप परदेशी यांनी सांगितले.
डीवाय पाटील विद्यापीठाच्या भाग्यश्री पाटील, लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आणि बोन्साय तज्ज्ञ प्राजक्ता काळे यांना राष्ट्रपती कोविंद लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार देतील, तर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन होईल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हेही वाचा Helmet Compulsion In Mumbai: मुंबईत आता दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हेल्मेट घालणं सक्तीचं; पहा नियम मोडल्यास कितीचा दंड!
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेजवळील देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे आणि शिला मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांतील पंतप्रधानांचा पुणे जिल्ह्याचा हा दुसरा दौरा असेल. मार्चमध्ये त्यांनी पुणे मेट्रो रेल्वेचे उद्घाटन केले आणि अनेक नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली.