Coronavirus Update: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 351 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, तर 3 जणांचा मृत्यू

त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता 14,067 इतकी झाली आहे. सध्या यातील 2,569 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 11,356 पोलीस योद्ध्यांनी कोरोनाला हरवलं आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. परंतु, दुर्देवाने 142 कर्मचाऱ्यांची कोरोना विरुद्धची लढाई अयशस्वी झाली आहे. यासंदर्भात पोलीस विभागाने माहिती दिली आहे.

Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

Coronavirus Update: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 351 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता 14,067 इतकी झाली आहे. सध्या यातील 2,569 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 11,356 पोलीस योद्ध्यांनी कोरोनाला हरवलं आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. परंतु, दुर्देवाने 142 कर्मचाऱ्यांची कोरोना विरुद्धची लढाई अयशस्वी झाली आहे. यासंदर्भात पोलीस विभागाने माहिती दिली आहे.

कोरोना संकटकाळात पोलीस कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडले आहे. मात्र, हे करत असताना त्यांना आपल्या जीवाला धोका पत्कारावा लागला आहे. राज्य सरकारकडून कोरोना साथप्रतिबंधक आणि उपचार कार्याशीसंबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खासगी, कंत्राटी, मानसेवी कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमासंरक्षण पुरवण्यात येत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळत आहे. (हेही वाचा - MP Sanjay Mandlik Corona Positive: शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यासह कुटुंबातील 2 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, आतापर्यंत अनेक कोरोना योद्धे, राजकीय नेते, कलाकार आदी कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. यातील अनेकांची कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे. आज नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तसेच कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यासह कुटुंबातील 2 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली.