Coronavirus Update: महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण, जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (29 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

Covid 19 (Photo Credit Twitter)

महाराष्ट्राला (Maharashtra) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यातून मुक्त करण्यासाठी शासनासोबत सर्व कोविड योद्धा (COVID Warriors) दिवसरात्र कष्ट करत आहेत. राज्य आरोग्य मंंत्रालयाच्या (Maharashtra Health Department) माहितीनुसार मागील 24 तासात राज्यात कोरोनाचे एकुण 16,867 नवे रुग्ण आढळुन आले आहेत, यानुसार राज्यातील एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या  (Total COVID 19 Cases)   7,64,281 वर पोहचली आहे.  तसेच काल (29 ऑगस्ट) 328 कोरोना रुग्णांची झुंज अयशस्वी ठरली असल्याने राज्यात मृतांचा आकडा 24,103 वर पोहोचला आहे. राज्यात काल दिवसभरात 11,541 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,54,711 इतकी झाली आहे

आपण जर का कोरोनाच्या एकुण आकड्यावरुन नजर हटवुन अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांंची आकडे पाहिलेत तर आपल्याला कळेल की कोरोनाचा प्रसार दिवसागणिक नियंंत्रणात येत आहे. सध्या कोरोनाचे केवळ 1,85,131 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संंपुर्ण राज्यात आहेत. राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 72.58 टक्के आहे, तर मृत्युदर अवघा 3.15 टक्के आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांची संख्या 35 लाखांच्या पार; देशात एकूण 63,498 मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (29 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 4153 282 15226 19661
अकोला 639 152 2986 3778
अमरावती 1046 124 3779 4949
औरंगाबाद 5813 656 16138 22607
बीड 1558 118 2936 4612
भंडारा 340 21 594 955
बुलढाणा 1089 73 2106 3268
चंद्रपूर 874 17 1048 1939
धुळे 2178 207 5136 7523
गडचिरोली 135 1 572 708
गोंदिया 556 16 819 1391
हिंगोली 290 35 1114 1439
जळगाव 7045 837 18191 26073
जालना 1263 130 2793 4186
कोल्हापूर 6194 599 14196 20989
लातूर 2744 263 4559 7566
मुंबई 19971 7596 115500 143389
नागपूर 11434 670 14075 26182
नांदेड 3205 212 3165 6582
नंदुरबार 1070 69 1220 2359
नाशिक 10298 858 26347 37503
उस्मानाबाद 1919 150 3603 5672
इतर राज्ये 642 70 0 712
पालघर 6639 574 17748 24961
परभणी 1262 75 1151 2488
पुणे 49365 4021 116062 169448
रायगड 5336 775 23145 29258
रत्नागिरी 1493 136 2292 3921
सांगली 4563 403 6869 11835
सातारा 4888 328 7707 12925
सिंधुदुर्ग 459 20 622 1101
सोलापूर 4636 753 13517 18907
ठाणे 20264 3747 105842 129854
वर्धा 341 17 460 819
वाशिम 327 27 1285 1640
यवतमाळ 1102 71 1908 3081
एकूण 185131 24103 554711 764281

राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यात असून सर्वात कमी रुग्ण हे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. मुंबईत एकूण संक्रमितांची संख्या 1,43.389 वर गेली आहे. आय सी एम आर पोर्टलवरील रिकंसीलेशन नुसार 142 बाधित रुग्ण प्रगतीपर अहवालातून कमी करण्यात आले आहेत. काल शहरामध्ये कोरोनाचे 682 रुग्ण बरे झाले आहे, यासह आजवर बरे झालेले एकूण रुग्ण 1,15,500 इतके आहेत