मुंबई: गोरेगाव येथे 3 वर्षीय चिमुरडा नाल्यात पडल्यानंतर रास्तारोको करत स्थानिकांनी व्यक्त केला संताप
मुंबईतील गोरेगाव येथील आंबेडकर नगर येथे राहणारा एक 3 वर्षीय मुलगा गटारात पडल्याने परिसरात एकच खबळब उडाली आहे.
मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) येथील आंबेडकर नगर (Ambedkar Nagar) येथे राहणारा एक 3 वर्षीय मुलगा गटारात पडल्याने परिसरात एकच खबळब उडाली आहे. गेल्या अनेक तासांपासून शोधकार्य सुरु असून अद्याप त्या मुलाचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे संपालेल्या स्थानिकांनी या सर्व प्रकाराला पालिका जबाबदार असल्याचा आरोप करत रास्तारोको केले आहे.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे या प्रकारानंतर घटनास्थळी भेट देणार होते. त्यापूर्वी स्थानिकांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. गोरेगांव येथे तीन वर्षांचा मुलगा गटरात पडला; शोधकार्य सुरु (Video)
काल (10 जुलै) रात्री पावणेदहाच्या सुमारास दिव्यांश सिंह हा 3 वर्षांचा चिमुरडा खेळताना उघड्या असलेल्या गटारात पडला. दिंडोशी पोलिसांसह अग्निशामक दलाचे जवानही दिव्यांशला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.