पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश , दोघांना अटक
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामध्ये थायलंडच्या तीन महिलांना नोकरीचं आमिष दाखवून भारतात आणलं होतं.
Pune Sex racket : पुण्यातील विमाननगर (VimanNagar) परिसरामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेलं सेक्स रॅकेट (Sex Racket ) जाळं पुणे पोलिसांनी उघड केल आहे. पुणे पोलिसांनी धाड मारल्यानंतर घटनास्थळावरून तीन विदेशी महिलांची सुटका करण्यात आली आहे. सोबतच दोन मॅनेजर्सना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासातच छापा टाकण्यात आला.
पुणे विमाननगर परिसरात अमर रामराव धुमाळ आणि तुषार अशोक बनसोडे या दोन व्यक्ती सेक्स रॅकेट चालवत होते. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामध्ये थायलंडच्या तीन महिलांना नोकरीचं आमिष दाखवून भारतात आणलं होतं. स्पा सेंटर्मध्ये थेरपिस्ट म्हणून त्यांना काम देऊ असे सांगितले. हा प्रकार पुणे पोलिसांना समजाताच त्यांनी सापळा रचून आरोपींना पकडले.
पुणे क्राईम ब्रांच आणि विमाननगर परिसरामध्ये टर्निंग प्वॉइंट शॉप नंबर 3, विंग 2, येथील आमंत्रा स्पा सेंटरवर हा छापा मारला आहे. मुलींची सुटका केल्यानंतर आता आरोपींच्याबाबतीत अधिक तपास सुरू आहे.