Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 191 जणांचा मृत्यू; आज 281 नव्या रुग्णांची नोंद तर, एकूण कोरोनाबाधीतांचा आकडा 4 हजार 870 वर

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

Covid-19 (Photo Credit: ANI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. यामुळे मुंबई (Mumbai) शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 191 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज एकूण 281 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 4 हजार 870 वर पोहचली आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 3 मेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत 24 हजार 942 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. त्यांपैकी 301 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 840 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज 281 रुग्णांची भर पडली आहे. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 762 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत कोरोना बाधीतांची संख्या 4 हजार 870 वर पोहचली आहे. हे देखील वाचा- Corona Update: मुंबई येथे एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement