Covid 19 Updates Maharashtra Today: महाराष्ट्रात एकूण 88 हजार 528 कोरोनाबाधित; दिवसभरात 2 हजार 553 रुग्णांची वाढ तर, 109 जणांचा मृत्यू
भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत.
कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2 हजार 553 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 88 हजार 528 वर पोहचली आहे. यापैकी 3 हजार 169 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 40 हजार 975 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. तसेच लॉकडाउनचा पाचवा टप्पा 30 जूनपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 2 लाख 56 हजार 611 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 7 हजार 135 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 24 हजार 303 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत कोरोनाच्या नव्या 12 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1924 वर पोहचला, महापालिकेची माहिती
एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत आहे.