Suicide: मुंबईत 25 वर्षीय नौदलाच्या खलाशाने केली आत्महत्या, चौकशी सुरू
सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. कुलाबा पोलिसांनी (Colaba Police) सध्या याप्रकरणी एडीआरची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबईत 25 वर्षीय नौदलाच्या खलाशाने आत्महत्या (Navy Sailor Attempt Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. नौदलाच्या या तरुण खलाशाने स्वतःवर गोळी झाडली. ही घटना शनिवारी, 12 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी घडली. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. कुलाबा पोलिसांनी (Colaba Police) सध्या याप्रकरणी एडीआरची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की खलाशीने आत्महत्या केली तेव्हा तो जहाजावर तैनात होता. सध्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. दुसरीकडे या घटनेनंतर नौदलाने याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की जेव्हा ते लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की खलाशी जवान मृतावस्थेत पडलेला होता. त्याच्या बाजूला एक सर्व्हिस रायफल होती.
हे नौदलाचे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर होते आणि जहाजावर तैनात होते असे सांगण्यात आले आहे. यादरम्यान त्याने आत्महत्या केली. नौदलाच्या खलाशीने त्याच्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याने आत्महत्या केली तेव्हा तो ड्युटीवर होती. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. त्यामुळे नौदलानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. हेही वाचा Mumbai: धोबीघाट परिसरात 65 वर्षीय महिलेला बेदम मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला अटक
सरकारच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षात सशस्त्र दलाच्या एकूण 819 जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. लष्कराने अशा प्रकारची सर्वाधिक 642 प्रकरणे नोंदवली आहेत. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट म्हणाले की, भारतीय वायुसेनेने अशा 148 आणि नौदलाने 29 प्रकरणे नोंदवली आहेत. तेव्हा ते म्हणाले होते की सेवेतील तणाव आणि आत्महत्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सशस्त्र दल सतत तणावमुक्त यंत्रणा सुधारण्यासाठी उपाययोजना करत आहे. एक व्यापक मानसिक आरोग्य कार्यक्रम तयार करण्यात आला आहे आणि 2009 पासून कार्यरत आहे.