24-hour Water Cut in NMMC: नवी मुंबई मध्ये 10,11 एप्रिल दरम्यान 24 तास पाणीपुरवठा बंद
24 तास पाणी पुरवठयानंतर मंगळवारी संध्याकाळी देखील कमी दाबानेच पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा (Navi Mumbai Municipal Corporation) 10 ते 11 एप्रिल दरम्यान 24 तास पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे खारघर, कामोठे भागात पाणी पुरवठा विस्कळीत असणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र (Bhokarpada Water Treatment Plant) आणि मोरबे धरण (Morbe Dam) ते दिघा मुख्य पाईपलाईनची देखभाल, तसेच कर्जत-पनवेल रेल्वे मार्गासाठी चिखले येथील मोरबे मुख्य पाईपलाईन स्थलांतरित करणे आणि दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील पाणीपुरवठा मुख्य लाईन ओलांडून कळंबोली येथील द्रुतगती मार्गाच्या पुलाच्या खाली त्याची व्यवस्था केली जाणार आहे.
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावर 10 एप्रिल दिवशी सकाळी 10.00 ते 11 एप्रिल सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवार, 10 एप्रिल संध्याकाळ ते मंगळवार सकाळी 11 वाजेपर्यंत एनएमएमसी क्षेत्रातील तसेच कामोठे आणि खारघरमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. याशिवाय मंगळवारी सायंकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
24 तास पाणीपुरवठा खंडीत केला जाणार असल्याने NMMC, कामोठे आणि खारघर नोड्समधील नागरिकांनी या कालावधीत पाणी सांभाळून वापरण्याचे आवाहन NMMC ने नागरिकांना केले आहे. नक्की वाचा: Mumbai Water Cut: मुंबई शहर पाणीकपात संदर्भात BMC द्वारे कारणांची मालिका, घ्या जाणून .
सध्या मुंबई शहरात देखील 30 एप्रिल पर्यंत 15% पाणी कपात करण्यात आली आहे. जलवाहिनीमध्ये पंक्चर झाल्याने होणारी पाणी गळती रोखण्यासाठी सध्या मुंबईमध्येही काम केले जात आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाळा तीव्र होत असताना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.