COVID-19 Cases in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिक, रायगडसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण? पाहा आजचे ताजे अपडेट्स

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (20 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

Coronavirus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असली तरीही बरे होणा-या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ब-यापैकी सुधारला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, काल (22 ऑगस्ट) राज्यात 14,492 नवे रुग्ण आढळले असून 297 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 61 हजार 942 इतकी झाली आहे. आतापर्यंत 4,80,114 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय सध्या राज्यात 1 लाख 69 हजार 516 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काल दिवसभरात 9241 रुग्ण बरे झाले असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात रिकव्हरी रेट 71.45% इतका झाला आहे. तर मृत्यूदर 3.27% इतका झाला आहे. 22 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेल्या 35,66,288 कोरोना चाचण्यांपैकी 6,61,942 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या 12,11,608 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून 35,371 रुग्णांना संस्थात्मक क्वारटाईन ठेवण्यात आले आहे. COVID19 Cases In Mumbai: मुंबईत आज 1 हजार 134 नव्या रुग्णांची नोंद; 32 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (22ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 3622 215 12098 15935
अकोला 475 148 2833 3457
अमरावती 1201 109 2885 4195
औरंगाबाद 6266 587 13732 20585
बीड 1852 82 2016 3950
भंडारा 259 10 439 708
बुलढाणा 934 68 1705 2707
चंद्रपूर 499 11 802 1312
धुळे 1966 178 4199 6345
गडचिरोली 67 1 503 571
गोंदिया 293 12 687 992
हिंगोली 296 29 874 1199
जळगाव 6103 746 14573 21422
जालना 1474 118 2201 3793
कोल्हापूर 6697 463 9849 17009
लातूर 2893 222 3329 6444
मुंबई 18301 7388 109368 135362
नागपूर 8592 482 9775 18850
नांदेड 2698 153 2259 5110
नंदुरबार 603 60 938 1601
नाशिक 10479 737 20172 31388
उस्मानाबाद 2050 124 2609 4783
इतर राज्ये 549 64 0 613
पालघर 6771 551 15823 23145
परभणी 1218 66 690 1974
पुणे 43497 3674 100500 147671
रायगड 5184 681 20334 26201
रत्नागिरी 1411 121 1814 3346
सांगली 3218 286 5075 8579
सातारा 3451 283 5566 9302
सिंधुदुर्ग 363 15 497 875
सोलापूर 4289 677 11550 16517
ठाणे 20601 3537 97491 121630
वर्धा 253 12 297 563
वाशिम 345 23 1005 1374
यवतमाळ 746 62 1626 2434
एकूण 169516 21995 480114 671942

राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात असून कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 35 हजार 357 वर पोहचली आहे. यापैकी 7 हजार 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे