Gold Rate: सोनं खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहे सोन्याचा आजचा भाव?

तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा भाव.

Representational Image | (Photo Credits: PTI)

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याचबरोबर लग्नसराईचा मौसम. यामुळे सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा भाव. कारण सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असते. (पहा काय होते कालचे दर)

1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्यामागील आजचा दर:

शहरं 22 कॅरेट सोनं 24 कॅरेट सोनं
मुंबई 30,750 31,900
पुणे 30,750 31,900
नाशिक 30,750 31,900
नागपूर 30,750 31,900

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर सारखेच आहेत. टॅक्स आणि घडणावळ यामुळे दर वर-खाली होऊ शकतात.

हे दर गुड ₹ रिटर्न्स (Good₹Returns) वेबसाईटनुसार दिले आहेत.