Mumbai: गोरेगाव येथील अविकसित इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, 8 जण जखमी
रविवारी सकाळी गोरेगाव येथील बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली आहे.
रविवारी (23/12/2018) सकाळी मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथे बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर आठजण जखमी झाले आहेत. आझाद मैदानाजवळील अविकसित इमारतीमध्ये कोसळली असल्याचे वृत्त एएनआय (ANI) या न्यूज एजन्सीने दिले आहे. पोलिसांसोबत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (National Disaster Response Force (NDRF)) देखील बचाव मोहिमेत सहभागी झाले आहे.
काही दिवसांपूर्वी 17 डिसेंबरला मुंबईतील अंधेरी परिसरातील कामगार हॉस्पिटलला आग लागली होती. यात 8 जणांनी आपले प्राण गमावले तर अनेकजण जखमी झाले होते. या दुर्घनेची सलोख चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.