Coronavirus Update: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोना रुग्ण, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून आतापर्यंत शहरात एकूण रुग्णांची संख्या 53,985 झाली आहे. शहरात काल दिवसभरात 516 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, आतापर्यंत 24209 लोक बरे झाले आहेत. सध्या शहरात 27,824 सक्रीय रुग्ण आहेत.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने ((Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 97 हजार 648 पोहचला आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 590 जणांनी आपला जीव गमावला आहे. मात्र, राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. यात मुंबईतील (Mumbai) रुग्णांचा अधिक समावेश आहे. महाराष्ट्रात काल (11 जून) 3607 नवीन कोरोना बाधित संक्रमित रुग्णांची व 152 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 97,648 इतकी झाली आहे. यावरून आता पुढच्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे 1 लाख रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. राज्यात आज नवीन 1561 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 46078 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 47,968 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून आतापर्यंत शहरात एकूण रुग्णांची संख्या 53,985 झाली आहे. शहरात काल दिवसभरात 516 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, आतापर्यंत 24209 लोक बरे झाले आहेत. सध्या शहरात 27,824 सक्रीय रुग्ण आहेत. Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्र हादरले! राज्यात गेल्या 3 दिवसांत 421 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रातील COVID-19 रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 54085 1954 24209
ठाणे 15679 398 6234
पुणे 10882 447 6208
औरंगाबाद 2306 123 1331
पालघर 1842 47 687
नाशिक 1746 100 1164
रायगड 1636 58 1020
सोलापूर 1578 120 654
जळगाव 1366 120 600
अकोला 927 40 497
नागपूर 919 12 523
सातारा 701 27 384
कोल्हापूर 675 8 504
रत्नागिरी 381 15 207
धुळे 341 25 161
अमरावती 310 20 235
जालना 225 6 148
अहमदनगर 224 9 147
हिंगोली 224 1 183
सांगली 195 4 108
नांदेड 186 9 116
यवतमाळ 170 2 117
लातूर 152 6 118
सिंधुदुर्ग 145 0 53
उस्मानाबाद 140 3 87
बुलढाणा 103 3 69
परभणी 80 3 62
गोंदिया 68 0 68
बीड 66 2 46
भंडारा 46 0 31
चंद्रपूर 46 0 26
नंदुरबार 45 4 30
गडचिरोली 45 1 38
वाशिम 20 2 6
वर्धा 14 1 7
अन्य जिल्हे 80 20 0
एकूण 97648 3590 46078

भारतात कोरोना व्हायरसने अक्षरश: हाहाकार माजविला असून दिवसागणिक वाढत जाणा-या रुग्णांच्या संख्येत 10 हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत भारतात COVID-19 चे 10,956 रुग्ण आढळले असून देशांत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,97,535 वर पोहोचली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now